‘धारावाहिक कादंबरी’लेखन करण्यात एक अनोखा थ्रिल अनुभवायला मिळतो. आणि त्यातला आनंदही काही वेगळाच असतो.
सुप्रसिद्ध जादूगार हौदिनी याला साखळदंडांनी जखडून एका लोखंडी पेटीत कुलूपबंद करून ती समुद्रात वा मोठ्या जलाशयात सोडत आणि तो मग अवघ्या काही मिनिटांतच आपली मुक्तता करून घेऊन पाण्यातून सुखरूप बाहेर येई, असं सांगतात. धारावाहिक कादंबरीकाराचं काहीसं असंच असतं. फरक एकच : जादूगाराला इतर लोक जखडून टाकत, तर इथं कादंबरीकाराला स्वत:च स्वत:च्या कोड्यांनी स्वत:लाच जखडून त्यांतून सहीसलामत बाहेर यायचं असतं.......